रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला
मुंबई -
राज्यातील गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हळहळू समोर येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी सत्तांतर होताना दिसत असून, अनेक मातब्बर नेत्यांना ग्रामपंचायतीही राखता आल्या नसल्याचे चित्र आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे यांना धक्का दिला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या राम शिंदेंविरुद्ध रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले होते. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येत आहे. राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांचा गट विजयी झाला आहे. चौंडी ग्रामपंचायतीतील ९ पैकी ७ जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या आहे.
No comments
Post a Comment