आमिर खान बच्चे कंपनीसोबत क्रिकेटमध्ये दंग
मुंबई -
बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकताच आपल्या कुटूंबियांना भेटण्यासाठी देहरादूनला गेला होता. त्यावेळी आमिर त्याच्या घराजवळील मुलांसोबत क्रिकेट खेळले. आमिरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो आपल्या लहान मित्रांसह क्रिकेट खेळताना दिसत आहे. आणि मुलांसोबत क्रिकेट खेळताना तो चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. आमिर खानचा हा व्हायरल व्हिडिओ विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. व्हिडिओमध्ये आमिर खानदेखील मुलांसोबत बरीच मस्ती करताना दिसत आहे. आमिरसोबत मुले सेल्फी आणि ग्रुप फोटो घेत असल्याचे दिसून येत आहेत.
No comments
Post a Comment