Breaking News

1/breakingnews/recent

“मोदी आणि ट्रम्प यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार'' - अनंत गाडगीळ

No comments


दिल्ली -

अमेरिकेच्या काल घडलेल्या अनपेक्षित घटनेमुले पडसाद जगभर पसरले आहे. लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली  लौकिकाला  बाधा  पोहोचवणाऱ्या  कालच्या  घटनेस जबाबदार  असलेल्या  राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड  ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. यांच्यासारख्या  बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो  रुपये  खर्च  करून पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी अहमदाबाद  येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती. निवडणुकीत उमेदवार  असलेल्या  दुसऱ्या  राष्ट्राच्या  अध्यक्षासाठी  एखाद्या  देशात  अशी  रॅली  सहसा  आयोजित  करणे  परराष्ट्र  धोरणाला  अनुसरुन  होत  नसते.  

अशा  ट्रम्प  यांच्यासोबतच्या नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीचे  दुष्परिणाम  भविष्यात भारताला  भोगावे  लागणार  आहेत, अशी  टीका  काँग्रेस  प्रवक्ते  माजी  आमदार  अनंत  गाडगीळ यांनी  केली  आहे. इंग्लडमध्ये  नवा कोरोनाचा  प्रकार  पसरू  लागला  असतानासुद्धा  इंग्लडच्याच  पंतप्रधानांना  प्रजासत्ताक  दिनाला  प्रमुख  पाहुणे म्हणून  बोलविण्यात  आले  होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे  भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे. याशिवाय  भारताभोवतालच्या  नेपाळ,  श्रीलंका  व  भूतान  या  देशामधील राजकीय घटना व चीनचा  या  देशांवरील  वाढत  चाललेला  प्रभाव  या  साऱ्यामुळे मोदींच्या  परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता  उघड  झाली  आहे, असेही गाडगीळ म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *