काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांवर अचूक निशाणा
मुंबई -
लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय . संजय निरुपम ट्विट करत म्हणाले की, कोरोनाच्या लसीकरणाचे उद्धाटन करताना फोटो काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती.
राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वत:चे फोटो काढून घेतले. त्यामुळे फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर चांगलं झालं असतं. दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता, असा खोचक टोला संजय निरुपम यांनी लगावला आहे.
No comments
Post a Comment