मोठी बातमी - मंत्री राम शिंदेच्या चौंडी गावात रोहित पवारांची बाजी
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल हळू हळू हाती येत असून अनेक ठिकाणी मातब्बरांना धक्का बसला आहे, माजी मंत्री राम शिंदे यांच्या चौंडी गावात रोहित पवार यांनी बाजी मारली असून रोहित पवार यांच्या गटाला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत तर दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात २० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले असून १७ पैकी १३ जागा विरोधी गटाला मिळाल्या असून हा विखे यांना मोठा धक्का आहे. नेवासे तालुक्यात विद्यमान मंत्री शंकरराव गडाख यांच्या पॅनलने सर्व ठिकाणी आघाडी घेतली आहे. नगर तालुक्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत असून माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर दिसून येत आहे. विधानसभेनंतर प्रथमच सर्व पक्ष आणि नेते सार्वजनिक निवडणूकींना सामोरे गेले असल्याने मतदारांचा कोणाकडे कल आहे हे या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.
No comments
Post a Comment