अजिंक्यवर कौतुकांचा वर्षाव: विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करावे
मुंबई -
टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया सिडनीमधील चालेला चौथा कसोटी सामना टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत २-१ च्या फराकाने पराभव करत चषक आपल्याकडे ठेवला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने चौथा अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना तीन विकेट्स राखून जिंकला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्तित आणि कठीण प्रसंगात भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेवर चोहूबाजूने कौतुकांचा वर्षाव होत आहे. इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही अजिंक्य रहाणेचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या मायकल वॉन याने ऑस्ट्रेलियाच्या पराभवनंतर अजिंक्यवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. भारताने विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करावे असे ते म्हणाले असा सल्ला यावेळी मायकल वॉन याने दिला. मायकल वॉन म्हणला की अजिंक्य रहाणेला नियमीत कर्णधार तर विराट कोहलीला फक्त फलंदाज म्हणून कसोटीत खेळवण्याचा विचार बीसीसीआयने करायला हवा. कोहली फलंदाज म्हणून आणखी घातक ठरु शकतो. रहाणेची अविश्वसनीय उपस्थिती आणि कर्णधाराबाबतचा जबरदस्त अनुभव मिळाला आहे.
No comments
Post a Comment