Breaking News

1/breakingnews/recent

मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडली

No comments



मुंबई -

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे-रेणू शर्मा यांनी केलेले आरोप या प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार याकडे  सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा ते बोलत होते.

  राजकारणात आयुष्य उभे करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येने योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मुंडे-शर्मा प्रकरणावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचाही हवाला दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचे निष्पन्न झाले. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचने योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *