शहराची खबरबात - व्हीआरडीईचे के .के. रेंज करू नका
News24सह्याद्री - व्हीआरडीईचे के .के. रेंज करू नका...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. पालेभाज्या स्थिर हिरवी मिरची कडाडली
पालेभाज्यांचे दर सध्या स्थिर आहेत मात्र हिरवी मिरची चांगलीच कडाडली आहे सध्या मिरची बाजारात चार ते पाच हजार रुपये क्विंटल तर किरकोळ बाजारात 100 रुपये किलोने विकली जात आहे शेवगा आणि गवारीच्या शेंगांची आवक कमी झाली असून दोन्ही शेंगांचा ठोक भाव पाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतका झाला आहे तर टोमॅटो आणि कांद्याचा दर पुन्हा घसरले असून नगर येथील कृषि उत्पन्न बाजारात पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे आढळून आले आहे
2. चार जणांना लसीकरणानंतर डोकेदुखी
लसीकरण झाल्यानंतर चार आरोग्य कर्मचाऱ्यांना ताप डोकेदुखी अंगदुखी चा त्रास झाला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे कोणतीही लस घेतल्यानंतर ताप अंगदुखी होणे ही सामान्य लक्षणे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले
3. नाट्यगृहसाठी नाट्य कलावंतांच्या सूचना मौलिक
सावेडी नाट्यगृहाच्या इमारतीसाठी शासनाकडून पाच कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे निधीअभावी हे काम थांबले होते या कामाला गती मिळणार आहे या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील नाट्य कलावंतांसह इमारतीची नुकतीच पाहणी केली
4. कुख्यात गुंड विश्वजीत कासार जेरबंद
नगर तालुक्यातील वाकडी येथे तरुणाचा खून करून पसार झालेला कुख्यात गुंड विश्वजीत रमेश कासार यांच्यासह त्याच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली येथून अटक केलीये मयूर बापूसाहेब नाईक भरत भिमाजी पवार संतोष अप्पासाहेब धोत्रे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत
5. व्हीआरडीईचे के .के. रेंज करू नका
राष्ट्रीय स्तरावरील केंद्र नगरमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले संरक्षण विभागाच्या
व्हीआरडीईचे केंद्र स्थलांतरित होत असल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी
व्हीआरडीओ च्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार संजीव जोशी यांच्याशी दिल्लीत चर्चा केली याबाबत येथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार विखे यांनी नुकतीच
व्हीआरडीईला भेट दिली
No comments
Post a Comment