Breaking News

1/breakingnews/recent

मला तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं: गिरीश बापट यांनी काढला चिमटा

No comments


मुंबई -

गिरीश बापट म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पण मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असा चिमटा गिरीश बापट यांनी काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बापट आले आहे. त्यावेळी त्यांनी हा चिमटा काढला. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे मी तुमच्या माध्यमातूनच ऐकत आहे. 

मुख्यमंत्रीपदाबाबत जयंतराव आणि मुख्यमंत्र्यांनीच ठरवायचे आहे, असा चिमटा काढतानाच मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असे बापट यांनी सांगितले.  केंद्र आणि राज्याचे काही कॉमन प्रश्न आहे. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही निर्णय घेता येईल, याबाबत चर्चा झाली. रेल्वे सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केंद्राने राज्याला अधिकाधिक निधी देण्याबाबतही चर्चा झाली. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. राज्यातील रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही चर्चा करण्यात आल्याचे बापट म्हणाले. बैठक चांगली झाली. दर 2 ते 3 महिन्यांनी अशी बैठक घेतली तर प्रश्न सोडवणे सोपे जाईल, असेही त्यांनी सांगितले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *