३० जानेवारीपासून अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धीत उपोषण
मुंबई -
अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून राळेगणसिद्धीत, संत यादवबाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजारे यांनी जाहीर केले आहे. २०११ मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनादरम्यान भाजपचे नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे ठोकत होते. मागण्या कशा योग्य आहे, हे संसदेत पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी केलेली भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का असा सवाल हजारे यांनी केला आहे. उपोषणाच्या वेळी या भाषणांची ध्वनिचित्रफीत (व्हिडीओ) प्रसारित केली जाणार असल्याचे हजारे यांनी सांगितले आहे. हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले आहे.
No comments
Post a Comment