सोनाक्षी सिन्हाच्या महागड्या ड्रेसची रंगली चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. नुकताच सोनाक्षीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. यासोबतच तिने हेवी इयररिंग्स देखील घातले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच भारी दिसत आहे . मात्र, यामध्ये सोनाक्षीच्या लूकपेक्षाही जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सोनाक्षीच्या ड्रेसच्या किंमतीची. सोनाक्षीच्या या ड्रेसची किंमत ऐकून कुणीही थक्क होईल कारण सोनाक्षीच्या या ड्रेसची किंमत तब्बल 39, 000 रुपये इतकी आहे. हा ड्रेस डिझाइनर अर्पिता मेहताने डिझाइन केलेला आहे.
No comments
Post a Comment