आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

मुंबई
आयुष्मान खुरानाने चंदीगड करे आशिकी या चित्रपटाचे शूटिंग नुकतंच पूर्ण केलय. दोन महिन्यांपूर्वी आयुष्मानने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. चंदीगड करे आशिकीच्या शूटिंगनंतर वाणी कपूरने शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदीगड करे आशिकी चित्रपटात सुशांतच्या जागी आयुष्मान खुरानाने आता काम केले आहे.
No comments
Post a Comment