‘बर्ड फ्ल्यू’ धोकादायक असल्याने राज्यात हाय अलर्ट घोषीत - राजेश टोपे
मुंबई -
कोरोना नंतर राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजाराने मृत्यूमुखी पडले आहेत.
सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचे आहे असे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूची प्रकरणं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.
No comments
Post a Comment