Breaking News

1/breakingnews/recent

भाजपा नेत्यांचे समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचे समाधान करावे: देवेंद्र फडणवीस

No comments



मुंबई -

मराठा आरक्षणा बद्दल आज सुनावणी होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षण हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून आज होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली असून त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती दिसत आहे. या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालतय त्यावरुन सरकारच्या मनात काय आहे तेच कळत नाही आहे. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपा नेत्यांचे समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचे समाधान करावे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 मराठा आरक्षण संदर्भातली जी स्थिती आहे, ती केवळ सरकारच्या घोळामुळे आहे. सरकार ठामपणे एक भूमिका मांडत नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन भूमिका मांडत आहे. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये प्रचंड फरक आहे. सरकारची कमिटी कुणाशी बोलते, काय निर्णय होतो काहीच कळत नाही, अशी शंका फडणवीस यांनी उपस्थित केली. भाजपाचे समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचे समाधान करा. तुमच्या नाकर्तेपणामुळे ज्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांचे समाधान करा. आमच्या समाधानाचा विषय तुम्ही सोडून द्या, आम्हाला तर कधी तुम्ही चर्चेलाही बोलावले नाही. आमची तुमच्या विषयी काही तक्रार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा पण मराठा समाजाला न्याय द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद दिसत आहे. कुठलाही समन्वय दिसत नाही. कोण कुठला निर्णय करतंय कुणालाच माहिती नाही. राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहे. सर्व प्रकारच्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा, अशी कृती राज्य सरकारची दिसत आहे. त्यातूनच एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला आहे असा आरोप फडणवीस यांनी केला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *