Breaking News

1/breakingnews/recent

जवसाचे गुणधर्मी फायदे

No comments



मुंबई -

जवसाचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. कर्करोगापासून सुटका करणारे फायबर जवसामध्ये विपुल असते. त्यामुळे जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.जवस ही तेल बी पण आहे. जवसाचे तेल स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना आवश्‍य वापरावे. तसेच हाडाच्या विकारांवर उपयुक्‍त मानली आहे. जवसाची चटणी रोज आपल्या आहारात नियमित समाविष्ट करणे आवश्‍यक आहे. त्याचे औषधी उपयोग असे. जवसमध्ये प्रोटीन्स २०.३ ग्रॅम, फॅट्स ३७.१ ग्रॅम, मिनरल्स २.४ ग्रॅम, फायबर ४.८ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स २८.९ ग्रॅम, कॅल्शियम १७० मिली ग्रॅम, फॉस्फोरस ८७० मिली ग्रॅम, आयर्न २.७ ग्रॅम.

१. लघवी साफ

 दाह कमी होण्यासाठी – लघवी करतेवेळी दाह किंवा आग होत असेल तर जवसाचा काढा द्यावा. हा काढा करण्याची कृती अशी, 12 ग्रॅम जवस व 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन ते चांगले ठेचून त्याचा 1 लिटर पाण्यात अंदाजे एक अष्टमांश उरेल एवढा काढा करावा. मग त्यात 12 ग्रॅम खडीसाखर घालून दोन चमचे रोज सकाळ संध्याकाळ प्यावे; लघवीची जळजळ कमी होते तसेच लघवीस साफ होते.

२. दंतरोगावर –

हिरड्या मजबूत रहाव्या व दंतदुखीवर उपचार म्हणून जवसाच्या तेलाने मसाज करावा.कफ पातळ होण्यासाठी – कफयुक्‍त ज्वरात (तापावर) जवसाच्या पिठाचे पोटीस करून छाती शेकली असता कफ पातळ होतो व ताप लगेच उतरतो.पाठदुखीवर – पोट, पाठ वगैरे ठिकाणी एकसारखे दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवसाचे पोटीस बांधीत जावे.

३. सूजेवर व कोणत्याही जखमेवर –

 कोणत्याही ठिकाणी मग ती जखम असो, सूज असो, अगर व्रण असो, लाल होऊन ठणका लागला असेल, तर जवसाचे पोटीस बांधावे. पू होऊन जखम फुटून बरे वाटते.

४. भाजले असता –

 भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी एकत्र घोटून त्याची पट्टी दिल्याने भाजलेले लवकर बरे होते.

पचन क्रिया चांगली होण्यासाठी – आहारात जवसाचा वापर करावा ज्यामूळे भूक चांगली लागते व पचनक्रिया चांगली होते.

५. सुदृढ आरोग्यासाठी – 

रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यावे त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते. रक्‍तदाब, रक्‍तशर्करा, हृदयाचे ठोके सारेच योग्य आरोग्यपूर्ण होतात. आरोग्याच्या कोणत्याच तक्रारी राहात नाहीत. अशाप्रकारे जवस हे गुणकारी आहे. हिवाळ्यात आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते.

६. जमालगोटा – 

जमालगोटा हा तीव्र रेचक आहे. जेपाळ जमालगोटा या नावाने तो ओळखला जातो. याचे बी व तेल गुणकारी असते. लहान प्रमाणात गुणकारी आहे. मोठ्या मात्रेत विषारी आहे. शरीरातील आप तत्त्व जुलाबावाटे आवाहन केल्यासारखे भरभर बाहेर पडते.

७. त्याचा उपयोग खालील रोगावर होतो

टाईप – टू डायबेटीस अस‍णाऱ्या रुग्णांमध्ये जवसातील लिग्नन उपयुक्त ठरते. कारण हे लिग्नन ब्लड शुगरचा समतोल साधते. हृदयरुग्णांसाठीसुद्धा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्करोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात. स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. असे असले तरी अती तिथे माती हा नियम जवसालाही लागू आहे. जवसाचे खाण्याचे प्रमाण राखले गेले पाहिजे आणि ते मर्यादेतच ठेवले पाहिजे त्याचे अधिक प्राशन आरोग्याला घातक ठरू शकते.

८. कफ बाहेर काढणे –

जवस कफ मोकळा करण्यासाठी खूप मदत करतं. जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे ताप देखील लगेच जातो.

९. पाठदुखी –

पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे. पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे. त्यामुळे नसा मोकळ्या होतात. दुखणं

१०. भाजलेल्या जागी बांधावे –

एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.

११. पचन क्रिया सुधरते –

जवसाचं आहारात विशिष्ट महत्व आहे. पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत करते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.

१२. अनेक फायदे -

रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यायल्याने बीपी, डायबेटीस, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात जवस खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी देखील जवस मदत करते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *