Breaking News

1/breakingnews/recent

भारतामध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्यांची संख्या ९६ वर

No comments




 दिल्ली -

ब्रिटनमधील नवीन कोरोना आता वेगाने पूर्ण जगात पसरला आहे. जगभरात कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे भारतामध्ये या नव्या स्ट्रेनची संख्या ९६ वर पोहोचली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या १०० वर पोहोचणार आहे. नुकताच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे.  ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांच्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंसिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी तीन नमुन्यांमध्ये E484K म्यूटेंट मिळाला आहे. कोविडचा हा म्यूटेंट मिळणं यासाठी चिंताजनक आहे कारण जुन्या विषाणूमुळे शरिरात प्रतिरोधक क्षमतेमुळे तयार झालेली तीन अँटिबॉडी यावर प्रभावहीन असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त अमर उजालाने दिले आहे.

तज्ज्ञ मंडळीचे म्हणनणे आहे की हा नवा म्यूटेंट जास्त धोकादायक नाही. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे डॉक्टर गिरिधर बाबा यांचे म्हणण आहे की, हा म्यूटेंट सप्टेंबरमध्येच भारतात दाखल झाला आहे. जर हा इतकाच धोकादायक असता तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेले हे चारही रुग्ण ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन राज्यातून टोकीयोमध्ये परतले होते. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या नवीन स्ट्रेनचा खुलासा झाल्याने जगभरामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *