मोठी बातमी - 'एलआयसी'च्या विमाधारकांना अभिनव संधी
News24सह्याद्री -
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी 'एलआयसी'ने एक नवीन मोहिम सुरु केली आहे. ह्या मोहिमेनुसार काहीही कारणांमुळे पाच वर्षांच्या आतील बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा नियमित करण्याची संधी विमाधारकांना दिली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मेडिकल टेस्टची गरज नसेल. ७ जानेवारी ते ६ मार्च दरम्यान हि मोहीम राबविली जाईल. 'एलआयसी'ने यासा ठी १५२६ कार्यालयांची निवड केली आहे. या योजनेनुसार पॉलिसीधारकांना लेट फी मध्ये देखील सूट मिळणार आहे. याशिवाय १ लाख ते ३० लाखांपर्यंतच्या वार्षिक प्रीमियम पॉलिसी वर २५ टक्के सूट दिली जाणार आहे. 'एलआयसी'चे देशभरात ३० कोटी ग्राहक असून, कोणत्याही कारणाने ज्यांची पॉलिसी बंद झाली त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे निश्चितच एक आनंदाची बातमी आहे.
No comments
Post a Comment