शहराची खबरबात - पुलाच्या कामाची खासदारांकडून पाहणी
News24सह्याद्री - पुलाच्या कामाची खासदारांकडून पाहणी...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1, पुलाच्या कामाची खासदारांकडून पाहणी
नगर शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या उड्डाणपूल कामाची खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या काम सुरळीत व्हावे त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे तसेच पथदिवे व इतर विद्युतीकरणाच्या स्थलांतराची तसेच भूसंपादन झालेल्या जागेचे लवकरात लवकर अतिक्रमण काढून जलवाहिनी स्थलांतराचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या
2, सात दिवसीय धरणे आंदोलनाची सांगता
नव्याने पारीत करण्यात आलेले तीन नवीन कृषी कायदे कायमचे रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मागील सात दिवसापासून शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची सांगता तीव्र निदर्शनाने करण्यात आली. मागील ५७ दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात आला.
3. अवतार मेहेरबाबांचा अमरतिथी उत्सव रद्द
अवतार मेहेरबाबांची अमरतिथी ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला दरवर्षी साजरी केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे हा उत्सव होणार नाही. अमरतिथीसाठी लाखो भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी मेहेराबादच्या टेकडीवर भव्य शामियाना उभारण्यात येतो, राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. उत्सवाआधीच हा परिसर देश-विदेशांतून आलेल्या भाविकांनी फुलून जातो. यंदा मात्र अमरतिथी उत्सव रद्द झालियाने मेहेरबाबा परिसरात शांतता असल्याचं दिसून येतंय
4. केडगाव बायपासला खून
निंबळक ते केडगाव बायपास रोडच्या कडेला असलेल्या उड्डाणपुलाजवळ एकाचा खून केल्याची घटना घडली याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महेश निसाद याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे हे करत आहेत.
5. रस्तालूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
रस्तालूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलाय तर एक जण फरार आहे. आरोपीने मोटारसायकल मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३१ हजार ३०० किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता. राजेश न्याणेश्वर सोळंके याला अटक करून त्याच्याकडून ६००० रु किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
No comments
Post a Comment