Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बर्ड फ्लू अलर्ट झोनमधून कोंबड्या आणि अंडी वाहतुकीस बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

No comments

    News24सह्याद्री  बर्ड फ्लू अलर्ट झोनमधून कोंबड्या आणि अंडी वाहतुकीस बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. बर्ड फ्लू अलर्ट झोनमधून कोंबड्या आणि अंडी वाहतुकीस बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
सात राज्यांमध्ये  'बर्ड फ्लू'चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. यात महाराष्ट्राचाही समावेश असून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. बर्ड फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये देखील ७८ रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आता त्याचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदरीचा उपाय म्हणून जिथे बर्ड फ्लू अलर्ट झोन जारी केला आहे. तिथून कोंबड्या व अंडी वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत 
2. तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक डॉ. राठोड यांना ‘मॅट’चा दिलासा
तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना ‘मॅट’ने दिलासा दिला आहे. राठोड यांच्या मोबाइलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांची बदली करण्यात आली होती. याप्रकरणी यांनी ‘मॅट’कडे दाद मागितली होती. आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश काढा, असे निर्देश ‘मॅट’ने गृहविभागाला दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी निलंबित आणखी एकाने ‘मॅट’कडे दाद मागितलेली आहे. 

3. जरे खून खटल्यात सरकारी वकिलांची नियुक्ती करा
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून एडवोकेट उज्वल निकम अथवा एडवोकेट उमेशचन्द्र यादव पाटील यांची नियुक्ती करावी. तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांने राज्य शासनाकडे केली. याबाबत जरे व त्यांचे वकील एडवोकेट सचिन पटेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री व पोलिस आयुक्तांना पाठवण्यात आले आहेत
4. मनपा क्षेत्रात आठ ठिकाणी लसीकरण 

पुणे येथील सिरम इंस्टीट्युटची कोव्हीशील्ड लस वापरायला सरकारने मंजुरी दिली. 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेची सोळा आरोग्य केंद्र व महानगरपालिका क्षेत्रातील ८ आरोग्य केंद्रात पहिल्यादिवशी लस टोचण्यात येणार आहे.

5. जिल्हा परिषद कागदोपत्री सतर्क; फायर ऑडिट साठी जुळवाजुळव
भंडाऱ्यातील घटनेची राज्यात कुठे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य सरकारने गंभीर पावले उचलली असून आरोग्य यंत्रणेला फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून आतापर्यंतच्या फायर ऑडिटच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. ऑडिट फक्त कागदोपत्रीच सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद मधील आग प्रतिबंधक उपकरणे धूळखात पडून आहेत.



 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *