जिल्ह्याची खबरबात - शेवगावात मृत कोंबड्यांची लपवाछपवी
News24सह्याद्री - शेवगावात मृत कोंबड्यांची लपवाछपवी...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. राजुरी शिवारात जळीत हत्याकांड
मुलीच्या डाव्या हातावर टॅटू असून तिची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले. कोणाला ओळख पटल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
2. लग्नसोहळयात बुलेट एन्ट्रीची जोरदार चर्चा
विवाह समारंभात बुलेट एन्ट्रीची जोरदार चर्चा वऱ्हाडी मंडळी मध्ये बघायला मिळाली. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या वधूवरांना शुभेच्छा संदेश पाठवला होता.
3. राजमाता जिजाऊंची शिकवण सदैव प्रेरणादायी – आ. आशुतोष काळे
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.
4. राहुरी तालूक्यात चो-या व घरफोड्यांचे सत्र
राहुरीचे पोलिस प्रशासन नेमके काय करत आहेत. असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
5. श्रीगोंदा नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार
जिल्हा अधिकारी यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या विरोधातील तक्रारीवर उपविभागीय अधिकारी यांची चौकशी करावी,असा आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांना दिला.
6. 23 प्राध्यापकांना करावे लागणार मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम
23 शिक्षकांना आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून काम करावे लागणार आहे
7. २०२४ पर्यंत निळवंडे धरणाचे काम पूर्ण होईल- जयंत पाटील
स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती महोत्सवात ते बोलत होते.
8. जप्त वाहनांचा लिलाव होणार
या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यासाठी तहसिल कार्यालय राहुरी येथे जप्त केलेल्या 9 वाहनांचे लिलाव करण्यात येणार आहेत.
9. नेवाशात झाला गडाखांच्या नव्या पिढीचा उदय
नेते उदयन शंकरराव गडाख यांनी नेवासे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय होत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा भार हलका केला त्यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक होत आहे यापूर्वी त्यांनी केलेले युवा संघटन या निवडणुकीत संघटनेच्या यशासाठी मजबूत पाया असल्याचे बोलले जाते
10. शेवगावात मृत कोंबड्यांची लपवाछपवी
शेवगाव शहराजवळील ओढ्यात कोणीतरी मृत कोंबड्यांचे अवशेष कुक्कुटपालनाची घाण टाकल्याचा समोर आलंय त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या विशेषतः बर्ड फ्लूचा संसर्गाकडे दुर्लक्ष करून अशाप्रकारे मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय
No comments
Post a Comment