8 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - भीषण अपघातात पारनेर तालुक्यातील नेते बचावले...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भीषण अपघातात पारनेर तालुक्यातील नेते बचावले
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे हे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी तसेच कार्यकर्ते संदीप नगरे यांच्यासह चिचोंडी पाटील येथे प्रचारासाठी गेले होते. प्रचार आटोपून ते पुन्हा पारनेर कडे परतत असतानाहा अपघात घडलाय
2. घोडेगाव तालुका निर्मिती अखेरच्या टप्प्यात
नेवासा तालुक्याचे विभाजन होऊन प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मिती प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली आहे तालुका निर्मितीसाठी लागणाऱ्या आवर्ती खर्चाचा तपशील संबंधित खातेप्रमुखांना कडून जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला तसे पत्र नेवाशाच्या तहसीलदारांना पाठवण्यात आले आहे त्यांनीही पुढील कारवाई तात्काळ सुरू केले
3. कर्जतच्या 68 दांडीबहाद्दर कर्मचार्यांना नोटिसा
कर्जत तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत यासाठी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गाला दांडी मारल्यामुळे 68 कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत विशेष म्हणजे यामध्ये काही शिक्षकांचाही समावेश आहे त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
4. तूर खरेदी नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांना आवाहन
जिल्ह्यात २८ डिसेंबर, २०२० पासूनच तूर खरेदी संदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात एकूण १३ खरेदी केंद्रे प्रस्तावित असून ११ खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
5. बर्निंग कारचा थरार, बी एम डब्ल्यू जळून खाक
पवन सदाशिवे हे गाडी चालवत होते आग लागल्यानंतर गाडीतून बाहेर निघूपर्यंत त्यांच्या हाताला व पायाला, पोटाला भाजले असून पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
6. आ. रोहित पवारांकडून पं. नरेंद्र मोदींची प्रशंसा
केंद्र सरकारने जपानशी केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.मात्र, या करारातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा सर्व राज्यांना समान लाभ मिळावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.
7. शेवगावात बारा दिवसांपासून निर्जळी
जायकवाडी धरणात पुरेसे पाणी आहे शेवगाव पाथर्डी योजनेतून अन्य गावे व पाथर्डी शहराला नियमित पाणीपुरवठाही होत आहे मात्र नगर परिषदेच्या कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणार्या नगर परिषदेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जातोय
8. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपानराव बानकर यांची निवड
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपानराव बानकर यांची निवड करण्यात अली तर उपाध्यक्ष:पदी विकास बानकर, कोषाध्यक्ष: दिपक दादासाहेब दरंदले, सरचिटणीस: बाळासाहेब बोरुडे आणि चिटणीसपदी अप्पासाहेब शेटे यांची नियुक्ती करण्यात अली. यावेळी नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले
9. साई संस्थानच्या फलकावर काळे फेकले, भुमाता ब्रिगेडचे कार्यकर्ते ताब्यात
शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले हर्षल मनोहर पाटील मीनाक्षी रामचंद्र शिंदे व मनीषा राजाराम कुंजीर यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले
10. जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकरी चिंतेत
जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून गुरुवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस होत आहे अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली अवकाळी पावसाने गहू कांदा हरभरा द्राक्ष आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे शनिवारीही पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे
No comments
Post a Comment