Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात

No comments

       News24सह्याद्री शहरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात....पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. शहरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात
पूर्ण लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज झाले केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्रात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे
2. मनपाच्या २७ कामांच्या निविदांना ब्रेक

महापालिकेच्या कामांसाठी ठेकेदारांकडून दाखल करण्यात आलेल्या निविदा छाननी समितीने नामंजूर केले असून विविध कामांच्या 27 निविदांची प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.  कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने निविदांना स्थगिती देण्याची ही पहिलीच घटना आहे. ठेकेदार संस्थानी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी नियमित भरावे असा नियम आहे. परंतु ठेकेदार संस्थांकडून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरल्यास त्याचा भुर्दंड पालिकेला  बसतो. ही बाब लक्षात घेऊन छाननी समितीने हा निर्णय घेतला असून सन  2016 17 मध्ये किती कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलाय याविषयीचा अहवाल सादर करण्याचा आदेश ठेकेदारांना देण्यात आला आहे

3. जिवाजी महालेंचे नाव हृदयात कोरले गेले - आ. जगताप 

हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडले गेलेले मावळे निष्ठेने, एक विचाराने लढले, अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्यात ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थ करणारे जीवाजी महाले होते. त्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आजच्या स्मृतिदिनामुळे अधिक उजळली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.  प्रेमदाननजीक जिवबा महाले चौक असे नाममकरण २०१५ मध्ये झालेल्या या ठिकाणी नव्या फलकाचे अनावरण जीवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. 

4. कोट्यवधींच्या घोटाळ्याचा तपास संथ गतीने 

बँकिंग क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या अहमदनगर शहर सहकारी आणि नगर अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा चव्हाट्यावर येऊन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास मात्र संथ गतीने सुरू आहे. शहर बँकेच्या गुन्ह्यात अद्याप पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेला नाही .  या सर्व गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेत मार्फत तपास सुरू आहे
5. बांधकाम समितीचे सभापती घेणार तालुकानिहाय आढावा
जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येणारी विविध विकास कामे व त्यावरील खर्चाचा तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी लवकरच आढावा बैठका घेणार असल्याचे संकेत बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिले. जिल्हा परिषदेला विकास कामे करण्यासाठी राज्य सरकारसह जिल्हा नियोजन समितीकडून निधी येतो. हा शासनाकडून मिळालेला निधी दोन वर्षातच खर्च करता येतो. मात्र अनेक कामे दोन वर्षात पूर्ण होत नसल्याने निधी परत जाण्याचे प्रकार झाले आहेत. आगामी काळात हे प्रकार टाळण्यासाठी बांधकाम समितीच्या सभापतींनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तालुकानिहाय आढावा बैठका घेण्यात येणार आहे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *