Breaking News

1/breakingnews/recent

13 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

     News24सह्याद्री -  'परळी पिपल्स'च्या श्रीरामपूर शाखेत ११ कोटींचा अपहार.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. आज जिल्ह्यात कोरोना लस होणार दाखल
 आज हि लस जिल्हा परिषदेतील कक्षात दाखल होणारे. नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गेल्या आठवड्यात मनपा हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात ड्राय रन करण्यात आले.  ड्राय रन यशस्वी झाल्याने आता शनिवारपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे

2. नगर -  शिर्डी महामार्गासाठी 500 कोटी मंजूर
नगर शिर्डी महामार्गाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली 

3. 'परळी पिपल्स'च्या श्रीरामपूर शाखेत ११ कोटींचा अपहार  
संजय शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा अपहार मोठ्या रकमेचा व तपास क्लिष्ट असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे

4. जिजाऊ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 
रक्तदान शिबीरात १११ युवकांनी उस्फुर्त रक्तदान करून जिजाऊ जयंती उत्सहात साजरी केली. या वर्षीचे या रक्तदान शिबिराचे हे ३ रे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जामखेड सह निबंधक देवीदास घोडेचोर व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

5. तहसीलदारांचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील उपसरपंच राजेंद्र मोटे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोटे यांच्या बाजूने निर्णय देत तहसीलदारांचा निर्णय रद्द ठरविला आहे

6. संगमनेर नगर परिषदेत 'महिलाराज'
सभापतीपदी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांची निवड झाली. तर सहा पैकी पाच विषय समित्यांच्या सभापती पदी महिला नगरसेवकांची निवड झाल्यामुळे संगमनेर नगर परिषदेत महिलाराज पाहायला मिळणार आहे

7. राहुरी चोरांचा धुमाकूळ
साडेसहा किलो चांदीचे व 45 ग्रॅम सोन्याचे दागिने असा चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

8. एकाच दिवशी तब्बल अकरा हॉटेलवर छापे
जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने तालुक्यातील अकरा हॉटेलवर छापा टाकत सुमारे 61 हजार रुपये किमतीच्या अवैध देशी दारूचे साठे जप्त केले आहेत. तसेच याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे

9. गुटखा तस्करांवर कारवाई
 पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हिरा पान मसाला, आरएमडी, विमल पान मसाला व रॉयल सुगंधी तंबाखू  हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

10. निवडणुकीपूर्वीच उमेदवारांची घोषणा
 कर्जत नगरपंचायत हद्दीमधील जोगेश्वर वाडी येथील सभामंडपाचे लोकार्पण माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी उमेदवारांची घोषणा केली 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *