शहराची खबरबात - अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर
News24सह्याद्री - अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर....पहा शहराची खबरबात
फायलींचा निपटारा करण्यासाठी मागील महिन्यापासून सुट्टीच्या दिवशी जिल्हापरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जात आहे. मात्र आजच्या सुट्टीच्या दिवशी त्यांना कामासाठी नव्हे तर आरोग्य तपासणीसाठी बोलवण्यात आले आहे. तसा अध्यादेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. दैनंदिन कामे करताना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा केवळ संदेश न देता मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला त्यानुसार आज सकाळी 10 ते दुपारी एक दरम्यान जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची थायराइड, शुगर, एचबी रक्त तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे
केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांची मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. रस्ते, लाईट ,ड्रेनेज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून दहा कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली.
जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारपूस केली. काल कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले बाहेर पडले. महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहरातील शिवभोजन केंद्राकडे मोर्चा वळवला.
5. अग्निशमनबंब खरेदी बाबत मनपा बेफिकीर
कोणत्याही कारणाने आग लागल्यास ती तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते तशी खबरदारीही घेतली जाते. महापालिका मात्र याबाबत बेफिकर असल्याचं समोर आले. महापालिकेकडे दोनच अग्निशमन बंब आहेत तेही जुने झाले आहेत. नवीन वाहनांचा प्रस्तावही धूळखात पडून आहे. शहरात आगीची मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय
No comments
Post a Comment