शहराची खबरबात - एसटीच्या सुरक्षितता मोहिमेला उद्यापासून सुरुवात
News24सह्याद्री - एसटीच्या सुरक्षितता मोहिमेला उद्यापासून सुरुवात...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. एसटीच्या सुरक्षितता मोहिमेला उद्यापासून सुरुवात
वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्य पद्धती पातळ्यांवर भर देणे राज्य परिवहन मंडळाच्या वाहनांना अपघात होणार नाही यासाठी योग्य काळजी घेणे आदींवर भर देऊन ही मोहीम राबवण्यात येणार आहे
2. मुख्याध्यापक मारहाण प्रकरणी ; मोहन बोरसे यांचा निषेध
भुतकर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल यांची पूर्व परवानगी घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला होता. ही सर्व घटना पाहता मोहन बोरसे यांनी केलेले कृत्य हे निश्तिपणे निषेधार्थ असून, या कृत्याचा अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे निषेध करण्यात आला. मोहन बोरसे यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदात म्हटले आहे.
3. पगारवाढीसाठी मेहेर बाबा ट्रस्ट कामगारांना तारीख पे तारीख
15 जानेवारी रोजी सदर प्रकरणाच्या तारखेला विश्वस्त दुपारी उशिरापर्यंत हजर न राहिल्याने लाल बावटा सलग्न अवतार मेहरबाबा कामगार युनियन चे पदाधिकारी व कामगार सभासदांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय पुढे ठिय्या मांडला न्याय मिळत नसेल तर आत्मदहनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला
4. गर्दी करू नका, मिरवणुका काढू नका
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे तर 18 जानेवारी रोजी जिल्हा व सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे यावेळी नागरिकांनी गर्दी न करता घरीच बसून प्रसारमाध्यमांद्वारे निकालाची माहिती घ्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले
5. बोठेच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
जिल्हा न्यायालयात 7 डिसेंबर रोजी अर्ज केला होता न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी हा अर्ज फेटाळून लावला त्यानंतर बोठे याने एडवोकेट संतोष जाधव यांच्या माध्यमातून खंडपीठात 31 डिसेंबर रोजी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे या अर्जावर आता 18 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे
No comments
Post a Comment