Breaking News

1/breakingnews/recent

14 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

      News24सह्याद्री - नगर पुणे रोडवर स्माईल स्टोन हॉटेलसमोर अपघात...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. नगर पुणे रोड वर स्माईल स्टोन हॉटेल समोर अपघात
पुणे अमळनेर बस नगर दिशेने येत असताना स्माईल स्टोन हॉटेल मधून बलेनो कार बाहेर पडत असताना, कारच्या ड्रायव्हर ने मागेपुढे न पाहता, गाडी रस्त्यावर आणली, त्यातच  पुणे कडून नगर कडे येणारी बस कारला धडकली. बस च्या ड्रायव्हर ने प्रसंग ओळखून बस थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु कारला धडक बसली, यात  सुदैवाने कोणीही जीवित हानी झाले नाही.

2. आजची तरुण पिढी व्यसनाधीन न होता चांगले संस्कारक्षम व्हावी 
 उप महाराष्ट्र  केसरी पै बबन काका काशिद यांनी दिली असून याचाच एक भाग म्हणून दि 27 जानेवारी रोजी राज्यस्तरीय हाॅफ मॅराथॉन स्पर्धा जामखेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती पै बबन काका काशिद यांनी दिली आहे.
 
3. आग प्रतिबंधक उपकरणे कालबाह्य
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उत्कृष्ट पुरवण्यात येत असल्या तरी रुग्णालयातील आग  प्रतिबंधक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे जिल्ह्यातील वरिष्ठ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील प्रतिबंधक उपकरणे कालबाह्य झाली आहेत प्रशासनाने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची फायर सेफ्टी ऑडिट करून घ्यावे अशी मागणी होत आहे
   
4. कुकुट पालकांवर संक्रांत
कोपरगाव तालुक्यातील 223 कुक्कुट पालकांकडे 14 लाख 44 हजार कोंबड्या आहेत मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने अंडी चिकनच्या मागणीत कमालीची घट झाली आहे तर दुसरीकडे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी बँकेचे घेतलेले कर्ज रोजच्या खर्चाचा कसा मेल  घालायचा या विवंचनेतून येथील कुकुट पालक आर्थिक संकटात सापडले आहेत

5. खवय्यांची माशांना पसंती
शहर परिसरातील हॉटेल्समध्ये आता ग्राहक चिकन ऐवजी माशांना पसंती देत आहेत आणि काही जण शाकाहाराकडे वळले आहेत तर चिकन अंड्याच्या दैनंदिन मागणीत 25 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसतंय 
 
6. वृद्धेश्वर कारखान्यासाठी 120 उमेदवारी अर्ज
 विरोधी गटाने अर्ज दाखल केले असते तरी पाथर्डी गट महिला प्रतिनिधी वब  वर्ग संस्था मतदान संघात राजळे गटाचे चर्च आहेत त्यामुळे राजळे  गटांच्या काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे
  
7. सोनईचा चेहरामोहरा बदलून दाखवतो - तुकाराम गडाख
विरोध जिवंत राहिला तर सर्वसामान्यांना किँमत राहते मूलभूत कामांचा पुरता बोजवारा उडाला असून सत्ता मिळाली तर सोनईचा  चेहरामोहरा बदलून दाखवतो अशी ग्वाही माजी खासदार तुकाराम गडाख यांनी दिली

8. घनकचरा व्यवस्थापनाचा तिढा कायम
नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराने कामाची मुदत संपण्यापूर्वीच पळ काढल्याने गेले साडेतीन महिने कामगारांची वेतन रखडले आहे महापालिकेने नव्या ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी आता निविदा मागवल्या असल्या तरी वेतनाचा तिढा मात्र कायम आहे त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे
  
9. मतदानासाठी 780 कर्मचारी सज्ज
कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच  तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अधिपत्याखाली 780 अधिकारी-कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत

10. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्य रस्त्याची मागणी  
शेवगाव तालुक्यातील जवळपास चार कारखाने असून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते ट्रॅक्टरच्या डबल टेलर मुळे अनेक वेळा अपघात झालेले आहेत. पैठण रोड व क्रांती चौकाच्या पुढे चढ,उतार  असल्यामुळे अनेक वेळा ट्रॅक्टरचे पुढील चाके उचलून दोन चाकावरती ट्रॅक्टर त्या ट्रॉल्या ओढत असते. हे सर्व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शेवगाव येथे बाह्य रस्त्याची मागणी येथील नागरिकांमधूनजोर धरत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *