Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - शेताच्या बांधावरून दोन गटात हाणामारी

No comments

   जिल्ह्याची खबरबात - शेताच्या बांधावरून दोन गटात हाणामारी





TOP HEADLINES


1. चिखली ग्रामपंचायतीच्या 16 उमेदवारी अर्जावर हरकत
 निवडणूक निर्णय अधिकारी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांनी ही हरकत फेटाळल्याने या 16 जणांच्या विरोधात 4 जानेवारी ला कविता झेंडे यांनी डी.एस. मनोरकर यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय.

2. आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करा-मनसेची मागणी
कोरोना योध्दांना सरकारच्या भरती प्रक्रियेत सामील करुन घेण्याची मागणी केली. तर या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, युनियनचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, भारती भोसले यांसह अनेकजण  उपस्थित होते.  

3. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ
 रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा व तृणधान्य पिकांची  काढणी, मळणीची कामे शेतात जोरात सुरु आहेत. तर काही ठिकाणी शेतात गहू, कांदा, हरभर्‍याची पिके काढून शेतातच पडून असल्याने हातात आलेले पीक अवकाळी पावसाने जाते की काय अशी अवस्था शेतकर्‍यांची झालीय.

4. मोरया चिंचोरे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख  यांनी मोरया चिंचोरे गाव दत्तक घेतले असून गावात जलसंधारण मंत्री  शंकरराव गडाख आणि अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख  यांनी भरभरून निधी दिलाय, प्रतिष्ठानने केलेल्या या विकासकामांमुळे  या जिरायत भागाचा आर्थिक स्तर  उंचावलाय .

5. शेताच्या बांधावरून दोन गटात हाणामारी
राहुरी तालुक्यातील गुहा येथे  शेताच्या बांधावरून सोमवारी सकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे त्यात कुराडी सह  लाकडी दांडके लोखंडी पाइपचा वापर झालाय परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 16 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपी पसार झाले आहेत

6. पक्षाकडून जिल्हाधीकार्यांना जबाबदाऱ्या
 ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या दिले आहे पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे आहे

7. संगमनेर शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
टोळीतील तिघांना पथकाने मोठ्या शिफारसही पकडली तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आठ लाख 80 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

8. चोरीच्या मोटरसायकली मध्ये आर्थिक तडजोड करणारा अटकेत
अहमदनगर अहमदनगर गुन्हे शाखेचा पथकाकडून अटक करण्यात आली आहे अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावत अखेर त्याला अटक करण्यात आली आहे

9. राहाता तालुक्यातील  ग्रामपंचायत बिनविरोध  
लक्षीमन विखे, प्रा.भाऊसाहेब विखे, अमोल विखे, विजय पवार,निलेश विखे, कैलास विखे, सुयोग विखे, मयूर विखे, किरण विखे, महेंद्र वाघ, व ग्रामस्थ व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

10. छावा क्रांतिवीर सेनेचे विश्वनाथ वाघ यांचा इशारा
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंञी बाळासाहेब थोरात, नाशिक विभागीय आयुक्त, अहमदनगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *