शहराची खबरबात - शहरातील सर्व रिक्षा स्टॉप अधिकृत करून घेणार
News24सह्याद्री - शहरातील सर्व रिक्षा स्टॉप अधिकृत करून घेणार...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. शहरातील सर्व रिक्षा स्टॉप अधिकृत करून घेणार
भिंगार, आलमगीर, नागरदेवळे येथील प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेट बँक चौकात आमदार संग्राम जगताप मित्र मंडळ छावणी स्टेट बँक रिक्षा स्टॉपचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते
2. पाणी योजनेच्या कामात अडथळे आणणाऱ्यांवर होणार कारवाई
पाणी योजनेची २४ जानेवारीला पाहणी करणार असून फेज दोनच्या विलंबाला अधिकारीच जबाबदार असल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
3. ‘घर घर लंगर सेवे’च्या काढा वाटपाची सांगता
नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा पहिला टप्पा सुरू झाला असून, कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी झाली असल्याने शहरात काढा वाटप मोहीम बंद करण्यात आली अाहे, अशी माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली.
4. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी अधिकाऱ्यांना साकडे
रेल्वेमंत्री, खासदार व रेल्वे अधिकारी यांना निवेदन पाठवून त्यांचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा यांनी दिली.
5. नगर शहर काँग्रेस मध्ये दुफळी
नगर शहर युवा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक थेट मुंबईहून जाहीर झालुयाने शहरातील जुन्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता नियुक्त्या झाल्याने पुढील काळात हा संघर्ष अजून तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत
No comments
Post a Comment