Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जिल्हा बँकेसाठी विद्यमान चेअरमन गायकर, माजी आ.पिचड यांचे अर्ज

No comments

    News24सह्याद्री जिल्हा बँकेसाठी विद्यमान चेअरमन गायकर, माजी आ.पिचड यांचे अर्ज...पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES

1. जिल्हा बँकेसाठी विद्यमान चेअरमन गायकर, माजी आ.पिचड यांचे अर्ज दाखल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली असून मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाची रणनीती निश्‍चित करण्यात आली आहे पक्षाची  निवडणूक समितीची ही स्थापना केली असून यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री राम शिंदे यांचा समावेश आहे

2. नगरमध्ये 762 जणांना दिली लस
नगर शहरात महापालिका आरोग्य केंद्रावर सुरू असलेल्या चार लसीकरण केंद्रांमध्ये आतापर्यंत 762 जणांना लसीकरण करण्यात आले आहे दररोज 100 लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  मात्र नियमित होत नसले तरी इतरांच्या तुलनेत नगरमध्ये चांगला प्रतिसाद असल्याचे मानले जाते

3. नगर मधील तिघे एक वर्षासाठी हद्दपार
आशिष रघुवीर गायकवाड स्वप्निल अशोक ढवण टकलू मुक्तार शेख यांचा समावेश आहे बाळाचा व दहशतीचा वापर करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणे घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण करणे दरोडा टाकने  चोरी करणे घातक शस्त्र बाळगणे विनयभंग करणे अशा प्रकारची गंभीर गुन्हे या तिघांवर दाखल आहेत

4. लॉरेन्स स्वामी यांना दिलासा
 पोलिसांना त्याची अंमलबजावणी करावी लागली आणि आरोपीला कोर्टा समोरच सोडून द्यावे लागले डिसेंबर मध्ये घडलेल्या अटकेच्या कारवाईचा असा शेवट झाला आरोपीतर्फे एडवोकेट प्रज्ञा तळेकर व एडवोकेट सतीश यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते आरोपीला जामीन मंजूर असतानाही अशाप्रकारे त्याला पुन्हा अटक करून पोलीस कोठडीची मागणी बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला

5. तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याचे काम  निकृष्ट दर्जाचे 
सध्या या  रस्त्याचे काम सुरु आहे मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम याठिकाणी करण्यात आल्याची तक्रार   इथल्या नागरिकांनी केलीय. यासंदर्भात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *