Breaking News

1/breakingnews/recent

20 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

          News24सह्याद्री - माझ्या मुलीच्या पराभवाचे चुकीचे चित्र रंगवले - भास्करराव पेरे..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. माझ्या मुलीच्या पराभवाचे चुकीचे चित्र रंगवले - भास्करराव पेरे
ग्रामपंचायत निवडणूक भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला म्हणून चुकीचे रंग भरले असे परखड मत पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी श्रीगोंदा येथे व्यक्त केले. शिवाजीराव नागवडे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या 

2. मिरीरोड वरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचते पाणी
शहरातील मिरी रोडच्या कडेला पाण्याच्या पाइपलाइन असून त्या नेहमी लिकेज राहतात. नेमके रोडवर पाणी सोडण्याचा वॉल असून त्यामधुन पाणी बाहेर येते. या पाण्यामुळेच या रस्त्यावरती खड्डे पडले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषदेने तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत.

3. चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून
सावित्रीबाई शेळके असे मृत वृद्धेचे नाव आहे. या घटनेत जखमी झालेल्या चार वर्षीय बालिकेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले मात्र तोपर्यंत चोर पसार झाले होते. याप्रकरणी मृत सावित्रीबाई शेळके यांचे जावई यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी जबरी चोरी व खुनाचा गुन्हा दाखल केलाय

4. शाश्वत बियाण्यांसाठी बियाणे बँकांची चळवळ व्हावी
आपल्या देशामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी व शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी गावोगावी देशी बियाणांच्या बँका उभ्या राहिल्या पाहिजे असा आशावाद पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी संसदेतील खासदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी काल लोकसभेतील खासदारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा आशावाद व्यक्त केला

5. 500 डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले
शेवगाव - गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, पाचशे परकीय डॉलर्ससह रोख 80 हजार रुपये लंपास केले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

6. भोकरच्या उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव संमत
ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत उपसरपंच अधिकाराचा दुरुपयोग करतात कर्तव्य जबाबदारीने पार पाडत नसल्याची तक्रार सदस्य महेश पठारे यांनी केली याबाबत मांडलेला अविश्वास ठराव उपस्थित सदस्यांनी हात वर करून दोनतृतीयांश बहुमताने संमत केला

7. अजिंक्य रहाणेच्या चंदनापुरीत जल्लोष
 विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभर होत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या मूळ गावी देखील जल्लोष साजरा करण्यात आला. चंदनापुरी ग्रामस्थांनी व रहाने कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवत तसेच चंदनापुरी तील घराजवळ फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला 

8. सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी
सहा प्रकल्पांसाठी महावितरण कडे जमीन हस्तांतर झालेले आहेत. येत्या चार महिन्यात प्रकल्प उभारणी होऊन तेथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल असा विश्वास ऊर्जा मंत्री राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

9. दोन बिबट्यांची झुंज; झुंजीत दोघांचाही मृत्यू
अकोले वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लहित शिवारातील एका उसाच्या शेतात सात ते आठ महिन्याची मादी आणि एक ते सव्वा वर्षाचे नर यांच्यामध्ये झुंज सुरू होती. या झुंजीत त्या दोघांचाही मृत्यू झाला. तेथील ग्रामस्थांना हे दोन बिबटे  मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी ही माहिती अकोले वन विभागाला कळवली.

10. जिल्ह्यात आतापर्यंत 289 पक्ष्यांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 278 कोंबड्या व अकरा वन्य पक्षी असा एकूण 289 पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यात श्रीगोंदा तालुक्यातील भांडगाव येथील एका कावळ्याचा मृत्यू वर्ल्ड फ्ल्यूने झाल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून पक्षी मृत झालेल्या गावासह परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *