Breaking News

1/breakingnews/recent

10 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

  News24सह्याद्री - ग्रामपंचायत उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. लस आली तरी अर्सेनिक गोळ्या अजून गोण्याताच
 अल्बम गोळ्यांची खरेदी केली मात्र महिना लोटला तरी या गोळ्या अद्यापही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीत पडून आहेत कोरोना वरील लस असली तरी प्रत्यक्ष ग्रामस्थांतन  पर्यंत या गोळ्यांचा डोस पोहोचला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे
 
2. उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ
मोबाईल मधील विविध यॅप  च्या साह्याने निवडक मराठी हिंदी गाणे टाकून छोट्या-छोट्या व्हिडीओ क्लिप  तयार करीत आहेत आणि अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक मतदाराला व्यक्तिगत तसेच ग्रुपच्या माध्यमातून वारंवार शेअर करण्याचा सपाटा सुरू आहे मात्र या व्हिडीओ क्लिप मुळे मतदारांच्या मोबाईलची मेमरी फुल होत आहे

3. दर्जेदार डांगी  पशुधन निर्माण करता येणार  
बाजारामध्ये एक लाखांपेक्षा जास्त किंमत असलेला डांगी जातीचा वळू नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कर्णाला येथे मोफत देण्याचा निर्णय तालुक्यातील केळी रूमनवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला यामुळे आता वळूपासून शुद्ध मात्रेचा वापर कृत्रिम रेतनासाठी करून दर्जेदार डांगे पशुधन निर्माण करता येणार आहे

4. वृद्धेश्वराची  निवडणूक बिनविरोध करा
पाथर्डी येथील व्हाईट हाऊस येथे आदिनाथ शेतकरी मंडळाचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात मेळावा झाला अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे होते तर आमदार मोनिका यांच्यासह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
   
5. ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास
घरातील ५० हजार रुपये सहा तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला असून महिलेला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले याप्रकरणी  कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
  
6. वेळेत ऊस तोड होत नसल्याने शेतकरी धास्तावले
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच धास्तावले आहेत ऊस तोडून जाण्यास उशीर झाला तर एकरी उत्पादनात खूप मोठी घट होईल याशिवाय रब्बी हंगामातील पिकांना ही विलंब होत आहे त्यामुळे ऊस तोड मिळावी यासाठी शेतकरी कारखाना व्यवस्थापकाकडे चकरा मारताहेत
   
7. पुरवठा निरीक्षक शासकीय सेवेतून बडतर्फ
 सामाजिक कार्यकर्ते संकेत काळकुंभे  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते बिघोत यांनी शासकीय भरतीवेळी  गुन्ह्याची  माहिती दडवली असा त्यांच्यावर आरोप होता
  
8. कोरोनावर  मात करून आमदार बबनराव पाचपुते लोकसेवेसाठी  पुन्हा सज्ज
भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कोरोनावर  यशस्वी मात केली आहे प्रदीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर ते काष्टी येथील निवासस्थानी परतले आहेत त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले
    
9. पारनेर येथे निवडणूक पार्श्वभूमीवर दुसरे प्रशिक्षण शिबिर
निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया हि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून व्यवस्थित पार पडावी जेणेकरून त्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे तहसिलदार ज्योती देवरे यांनी यावेळी सांगितले
 
10. लोणी येथील तरुणांना सात लाख रुपयांचा गंडा
लोणी येथील दोन तरुणात शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली याबाबत या तरुणांच्या भावाने राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून संजय कडू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *