शहराची खबरबात - महापालिकेच्या उपायुक्तपदी यशवंत डांगे
News24सह्याद्री - महापालिकेच्या उपायुक्तपदी यशवंत डांगे...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. महापालिकेच्या उपायुक्तपदी यशवंत डांगे
नगर महापालिकेत तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. पवार यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली. आता मनपा उपायुक्त पदी यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2. कोरोना काळातील रजा स्पेशल लिव्ह म्हणून मंजूर करावी
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना उपचारासाठी घेतलेली रजा स्पेशल लिव्ह म्हणून मंजूर करावी अशी मागणी शिक्षक भारतीने शिक्षण मंत्र्यांना भेटून केली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली आहे
3. अनधिकृत नळ कनेक्शन त्वरित काढा
नागरिकांनी प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेवकांना माहिती दिली असून नगरसेवकांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता आर जी सातपुते यांची नागरिकांसमवेत बैठक घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
4. मंगळसूत्र ओरबडून दोन युवक फरार
नगर-कल्याण रस्त्यालगतच्या जाधव पेट्रोल पंपा मागे असलेल्या साई रुग्णालयजवळील विद्या कॉलनी येथील अडवोकेट गटणे यांची पत्नी दुचाकीवरुन जात असताना धूमस्टाईल आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र ओरबाडून नेले. दरम्यान या सर्व प्रकारामुळे कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय.
5. सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार
शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांची कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अ.ए.सो.च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ आरटीपीसीआर तपासणी विद्यालयात करण्यात आली.
No comments
Post a Comment