शहराची खबरबात - मनपात अकरा अभियंत्यांची पदे भरण्यास अखेर मंजुरी
News24सह्याद्री - मनपात अकरा अभियंत्यांची पदे भरण्यास अखेर मंजुरी....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. 3 गावठी कट्टे बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
अहमदनगर - जिल्ह्यातील होत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, त्यादृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत मिळालेल्या माहितीनुसार 3 गावठी कट्टे बाळगणारा सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडला. पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
2. मनपात अकरा अभियंत्यांची पदे भरण्यास आखेर मंजुरी
महापालिकेत अकरा अभियंत्यांची पदे भरण्याची परवानगी मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला होता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असूनतसा आदेशही जारी करण्यात आला
3. आर्सेनिक अल्बम वाटपाचा उडाला बोजवारा
सहा महिन्यांपासून या गोळ्या ग्रामस्थांन पर्यंत पोहोचल्याच नाहीत शेवगाव तालुक्यात गोळ्यांचे पाणी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आठवडा उलटला तरी या प्रकरणाची चौकशी कोण करणार याबाबत अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाहीये
4. आयजिंचा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा
जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 जणांना अटक केली याबाबत रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे उद्ध्वस्त केले आहेत
5. नगर मधील सर्व फलकांचा महापालिकेने आढावा घ्यावा
महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का नसेल तर या फलकांवर कारवाई का होत नाही जाहिराती किंवा शुभेच्छा फलकान बाबत न्यायालयाने मध्यंतरी आदेश दिले आहेत शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत विनापरवानगी फलक लावलेले असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत म्हणून शहरातील सर्वच फलकांचा आढावा घ्यावा अशी मागणी एडवोकेट आगरकर यांनी केली.
No comments
Post a Comment