Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर 'ऑडिट' ची तपासणी करा

No comments

 News24सह्याद्री शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर 'ऑडिट' ची तपासणी करा...पहा शहराची खबरबात


TOP HEADLINES


1. शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर 'ऑडिट' ची तपासणी करा

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालया सह ,धर्मादाय ट्रस्ट, सरकारी,खासगी संस्था च्या मालकीच्या रुग्णालयांची फायर तपासणी तातडीने करावी. अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

2. राज्यातील पोलिसही आता बोठेच्या मागावर
यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरी हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे दिसेल तिथे पकडा असा देश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आलाय. हा आदेश गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना देण्यात आला होता आता तो राज्यातील पोलिसांना पाठविण्यात आल्याने राज्याचे पोलीस त्याच्या मागावर राहणार आहेत
3. सावेडीतील नाट्य संकुलासाठी पाच कोटींचा कोटींचा निधी
महापालिकेतर्फे सावेडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या नाट्य संकुलासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध झालाय आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाकडून हा निधी मिळणार आहे यासाठी यापूर्वी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे मात्र नाट्यगृहाची आसनक्षमता वाढवण्यात आल्याने तसेच हे नाट्य संकुल सर्व सुविधांनी युक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे यासाठी किमान अकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित होता आता हा निधी मिळाल्यामुळे नाट्य संकुलाच्या रखडलेल्या कामास वेग येण्याची शक्यता आहे
4.कठोर कारवाई होईपर्यंत नायलॉन मांजा कर्दनकाळ
नायलॉन माझ्या पर्यावरणाला घातक असून त्याचा वापर अद्यापही सुरू आहे बाजारात आमच्या चोरून विकला जात असून कठोर कारवाई होईपर्यंत हा माझ्या पक्षी व मानवाचा कर्दनकाळ ठरत राहील अशी भीती पक्षीमित्र व निसर्ग अभ्यासक मंदार साबळे यांनी व्यक्त केली. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले असून याचा फटका निसर्गाबरोबरच मानवालाही बसत असल्याचं त्यांनी म्हटलंय
5. जिल्हा न्यायालय मध्ये आभासी ई-सेवा केंद्रचे उदघाटन
 जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे आभासी ई-सेवा केंद्राचे उद्घाटन न्यायमूर्ती गंगापूरवाला  यांच्या हस्ते करण्यात आलं गरजू व गरीब पक्षकार ज्यांच्याकडे फोन लॅपटॉप अशा सुविधा नाहीत अशा लोकांसारठी  हि सुविधा उपलब्ध करून देण्यात  आलीये.यामध्ये खटल्याची स्थिती सुनावणीची पुढील तारीख इतर तपशिलांबाबत माहिती प्रमाणित प्रति मिळवण्यासाठी प्रणालीद्वारे अर्ज करण्याची तसेच इतर सुविधा मिळणार आहेत 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *