जिल्ह्याची खबरबात - साई भक्तांची होतेय लूटमार
News24सह्याद्री - साई भक्तांची होतेय लूटमार...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. निळवंडे धरण आणि कालवे यांच्या कामाची पाहणी
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज निळवंडे धरण आणि कालवे यांच्या कामाची पाहणी केली .यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे ,अशोक भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते
2. जामखेड तालुक्यात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा
आज सर्वत्र संक्रांतीचा उत्साह दिसून येत असताना जामखेड तालुक्यातील महिलांनीहि मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा उत्साह महिलांमध्ये दिसून आला
3. बेलापूरातील शिक्षकाचा प्रामाणिकपणा
हा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र एम्प्लाँइज पेंशन ट्रस्टच्या वतीने एल आय सी ला देण्यात आलेला होता पण रस्त्याने जाताना हा चेक गहाळ झाला होता विटनोर सरांनी प्रामाणिकपणे तो चेक आणुन दिला त्या बद्दल शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले
4. साई भक्तांची होतेय लूटमार
दर्शनासाठी असलेला पास २०० रुपयांवरून २ हजाराचा करण्यात आला तसेच याठिकाणी कोणतेही सूचनाफलक नसल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली. साई संथांच्या या गलथान कारभाराबाबत आलेल्या भक्तांनी संताप व्यक्त केलाय
5. चायना मांजामुळे तरुण जखमी
संक्रातिच्या पूर्वसंध्येलाच नगर मध्ये एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्याचा प्रकार घडला धिरसिंग कल्याण सिंग या युवकाचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला गेला
6. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर रोहित पवारांकडे
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो ला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला राज्य शिखर बँकेचे कर्ज असल्याने बँकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती नुकत्याच मुंबईत राज्य बँकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना बारामती ॲग्रो कडे देण्यात आला
7. धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
जयंत पाटील संगमनेरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली.
8. सिद्धटेकला अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
येथील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केल्या आहेत. या कारवाईत ट्रक व अडीच ब्रास वाळू असा एकूण चार लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
9. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील पोल्ट्रीचे सर्वेक्षण
पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बर्ड फ्लू आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापण्यात आली आहे. यामध्ये चार टीम तयार करण्यात आल्या आहेत.
10. केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत आहे - अण्णा हजारे
माझ्या जानेवारीमधील नियोजित उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदान व्यवस्थापनाला अनेक पात्र पाठवूनही उत्तर दिल जात नाही यावरून केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची शंका अण्णा हजारे यांनी पत्रात उपस्थित केली
No comments
Post a Comment