7 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - इंदुरीकर महाराज प्रकरणी तारीख पे तारीख...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. वृद्धेश्वर कारखान्याची 12 फेब्रुवारीला निवडणूक
18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात माघारीची मुदत असून दोन फेब्रुवारीला अंतीम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.
2. राम मंदिर निधी संकलनात हातभार लावा - भास्करगिरी महाराज
आयोध्या श्रीराम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाच्या संदर्भात नेवासा येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते
3. शिर्डीकरांसाठी साई दर्शन सुलभ करण्याचा विचार
दर्शनार्थी भाविकांच्या १० टक्के कोठा स्थानिकांसाठी ठेवता येईल अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुरज बगाटे यांनी दिले. पत्रकार दिनानिमित्त बगाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
4. मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करा - आ. आशुतोष काळे
शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावीत असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घातले आहे. याबाबतचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे.
5. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार
निवडणूक बिनविरोध झाली असती पण केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी सात जागांसाठी होणार्या बुऱ्हानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय
6. दुर्मिळ घुबडाची तस्करी; सहा जण ताब्यात
पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे यांच्यासह पथकाने त्या परिसरात छापा टाकून त्या सहा जणांना ताब्यात घेतले व त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बेकायदेशीररित्या
घुबड जातीचा पक्षी आढळून आल्यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पुढील कारवाई वनविभागाने केली
7. पोलीस असल्याचे भासवून भामट्यांनी सोन्याचे दागिने केले लंपास
शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावरील शेतकि संघाच्या प्रवेशद्वारासमोर हा प्रकार घडला याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
8. भामट्या महिलेने प्रवासी महिलेला चालू बस मध्ये लाखोंना लुटले
कल्याण औरंगाबाद बसने प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित घटना घोडेगाव ते नेवासा फाटा या दरम्यान घडली आहे. या महिलेने फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
9. इंदुरीकर महाराज प्रकरणी तारीख पे तारीख
काल झालेल्या सुनावणी मध्ये कामकाजा पूर्वीच बचाव पक्षाचे एडवोकेट के डी धुमाळ यांनी पुढची तारीख देण्याची न्यायालयाला विनंती केली आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य करत याबाबत पुढील सुनावणी 13 जानेवारीला होणार आहे
10. पाथर्डीत फिरणाऱ्या माथेफिरूंचा बंदोबस्त करा
प्रकार शहरातील जय भवानी चौक, जुनी पोलिसलाइन या भागांमध्ये घडून मोठी दहशत निर्माण झाली. या प्रकारचा त्वरित बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी शहरातील महिलांनी पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
No comments
Post a Comment