शहराची खबरबात - स्थायी समितीतून आठ सदस्य होणार निवृत्त
News24सह्याद्री - स्थायी समितीतून आठ सदस्य होणार निवृत्त....पहा शहराची खबरबात
1. आमदारांनी घेतला हातात झाडू
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना स्वच्छतेचा संदेश देत वस्तू संग्रहालय येथे हातात झाडू घेऊन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची गरज असते प्रत्येक नागरिकांनी आपली कॉलनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केले
2. जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग
जिल्हा सहकारी बँकेने ४६४ जागांसाठी २०१७ साली राबविलेली भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या एका आदेशाचा आधार घेत ही भरती नियमित करण्यात आली असली तरी भरतीबाबत काही गंभीर तक्रारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक व माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केलेल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर सहकार विभागाने सरकारीऐवजी खासगी एजन्सीमार्फत संशयास्पद उत्तरपत्रिका तपासून घोटाळा दडपला अशी टिळक यांची, तर नायबरने परस्पर अन्य एजन्सीची मदत घेऊन भरती प्रक्रिया राबविली असल्याने भरतीच्या मूलभूत करारनाम्याचाच भंग झाला आहे, अशी चंगेडे यांची तक्रार आहे.
3. चार लाखांचे खोदकाम मशीन चोरटयांनी केले लंपास
पुणे रोडवरील नालेगाव शिवारात खोदकाम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून चार लाख रुपये किंमतीचे खोदकाम मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याप्रकरणी सादीक शहाबुद्दीन शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. अहमदनगरमध्ये साकारतेय जिजाऊ संस्कार केंद्र
महापालिकेने सावेडी उपनगरात भिस्तबाग येथे मराठा सेवा संघास दहा हजार स्क्वेअर फूट मोकळा भुखंड काही अटींवर विकसित करण्यासाठी दिलेला आहे. लवकरच या ठिकाणी ’जिजाऊ संस्कार केंद्र’चे भुमिपुजन मराठा सेवा संघाचे संस्थापक इंजि.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून सुंदर असे ’जिजाऊ संस्कार केंद्र’ सर्व समाज बांधवांसाठी उभारण्यात येणार आहे, असे मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित वाघ यांनी सांगितले.
5. स्थायी समितीतून आठ सदस्य होणार निवृत्त
नगर महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य एक फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे यासाठी नगरसचिव S. B. तडवी यांनी महासभा बोलावण्याचा प्रस्ताव महापौर बाबासाहेब वाकळे यांना सादर केला आहे त्यामुळे आता महानगरपालिकेत पुन्हा राजकीय घडामोडी रंगणार असून वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची फिटिंग सुरू होणार आहे
No comments
Post a Comment