Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - बाळासाहेब थोरात यांची थेट शिवसेनेवर टीका

No comments

      News24सह्याद्री - बाळासाहेब थोरात यांची थेट शिवसेनेवर टीका...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES

1. नामंजूर विकासाच्या निविदा मंजूर करून घेण्याची मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने  कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

2. ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार
 अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तात्याबा ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
  
3. देवदैठणमध्ये बिबटयाचे दर्शन
 श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराई मळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले.बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. बिबट्यामुळे परीसरात घबराट निर्माण झाली आहे.  
 
4. बर्ड फ्लूमुळे चार गावे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने जामखेड तालुक्यातील मोहा आणि नगर तालुक्यातील आठवड, निंबळक, बाराबाभळी ही गावे व परिसर सतर्क झोन म्हणून जाहीर केले आहेत.  

5. अकोले तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत   वैभव पिचड यांची टीका
 अकोले तालुक्यात प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून तालुक्यात पाण्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत का? असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे.

6. बाळासाहेब थोरात यांची थेट शिवसेनेवर टीका
 मागील 5 वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? 

7. बाल कामगारांना अंगाला चटके देऊन छळ  
उत्तरप्रदेश, बिहार येथील रहिवासी असलेले तीन बालकामगार राहुरी खुर्द येथील बेकरी चालकाकडे कामासाठी आणण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपाशी पोटी काम करून घेणे, काम न केल्यास अंगास चटके देणे मारहाण करणे, असे अघोरी प्रकार या पवन यादव नाराधमाकडून सुरु होते 

8. शेवगावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
 सह्याद्री सामाजिक संघटना व शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त उपक्रमाने कोरोनामुळे   शिक्षणाच्या बाबतीत झालेली उदासीनता व  भीतीच्या  वातावरणामध्येहि  ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवले. अश्या विद्यार्थ्यांच्या  कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *