News24सह्याद्री -जिल्हा बँक लढवण्याचे राम शिंदे यांचे सुतोवाच...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. साईबाबा संस्थान चे नवीन विश्वस्त मंडळ जाहीर होणार
राज्यसरकार शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर नवीन विश्वस्त मंडळ लवकरच निवृत्त करणार असून ते अंतिम टप्प्यात असल्याचे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. नवीन विश्वस्त निवृत्तीबाबत सुनावणी झाली सदरील सुनावणी काल निकाली काढण्यात आली असून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीची तपासणीसाठी यापूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने चार सदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते
2. जिल्हा बँक लढवण्याचे राम शिंदे यांचे सुतोवाच
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवण्याचे सुतोवाच भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड येथे केले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष विधी आघाडीच्या अध्यक्षपदी अॅड. प्रवीण सानप, तर जिल्हा उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी मनोज कुलकर्णी यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा माजी मंत्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते
3. ग्रामपंचायतींसाठी ७० टक्क्याहून अधिक मतदान
अहमदनगर जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ५ वाजता संपली गेल्या १० दिवसापासून निवडणुकीचा धुरळा उडाला होता जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे किरकोळ अपवाद वगळता निवणूक शांततेत पार पडली असून ७० टक्क्यांवर सरासरी मतदान झाले असून आता १८ तारखेला गावांचे नवीन कारभारी कोण हे समजेल उमेदवारांचे भविष्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे
4. नगर मनमाड महामार्गासाठी ५०० कोटी
नगर मनमाड महामार्गासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या कामासाठी ऑनलाईन निविदाही काढण्यात आली असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार सुंजय विखेंचे यासाठी आभार मानले.
5. वृद्ध महिलेची दहा लाखांची फसवणूक
बोलेगाव फाटा गणेश चौक येथे राहणाऱ्या कमल लक्ष्मण मोरे यांची चंद्रकांत बापूराव जाधव त्या व्यक्तीने जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून दहा लाख रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली या महिलेने याबाबत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे
6. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ९० गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ९० गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली सर्वच गावांमध्ये चुरशीच्या निवडणूक होत असून सायंकाळी ५ वाजेपर्यन्त सरासरी ८० टक्क्याच्या पुढे मतदान झाल्याची माहिती प्रशासनाणे दिली किरकोळ प्रकार वगळता सर्वच ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली
7. चांदगाव परिसरातील शेतकरी अडचणीत
गेल्या दहा दिवसांपासून कृषिपंपाच्या विद्युत रोहित्राची मुख्य केबल जळाल्याने पाथर्डी शहरातील चांदगाव रोड येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जळालेली मुख्य केबल तातडीने बदलून मिळावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे शहर अभियंता मयूर जाधव यांना देण्यात आले. विद्युत विभागाने याची तातडीने दखल घेऊन जळालेली केबल नवीन टाकून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, जाधव यांनी तातडीने नवीन केबल टाकण्याचे आश्वासन दिले.
8. कर्जतच्या सौंदर्यात भर घालणारा टाकाऊतून टिकाऊ सेल्फी पॉइंट
कर्जत शहराला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धे अंतर्गत कर्जत शहरात शहराच्या मुख्य रस्त्यावर टाकू वस्तूंना एकत्र करत त्या पासून टिकाऊ असा सेल्फी पॉइंट बनवण्यात आला उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आम्ही कर्जतचे सेवेकरी या अभियानात स्वच्छता अभियाना बरोबरच झाडांना रंग देणे भिंतीवर घोषवाक्य रंगविणे टाकाऊ वस्तू मधून टिकाऊ वस्तू उभारणे आदी कल्पना राबवल्या जात असून या अंतर्गत शहरातील निरुपायियोगी टायर चे संकलन करून त्यापासून दादा पाटील महाविद्यालयाच्या जवळ सेल्फी पॉइंट बनवण्यात आलाय
9. महिलेस मारहाण करून १ लाख ११ हजारांची चोरी
अज्ञात चोरट्यांनी महिलेला रॉड व दगडाने जबर मारहाण करून रोख पाच हजार व सोने असे एकूण एक लाख 11 हजार रुपयांची चोरी केली या प्रकरणी सहा अज्ञात चोरट्यांनी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
10. अवैध दारू विरोधात कारवाई मोठी कारवाई
जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत 1 लाख 9 हजार 526 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणार्यांचे धाबे दणाणले
No comments
Post a Comment