शहराची खबरबात - कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी
News24सह्याद्री - कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार आहे पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा महापालिकेच्या वसुली विभागाची बैठक घेतली यामध्ये त्यांनी एकूण कारभार पाहून चांगलीच कान उघाडणी केली
2. कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी
ग्रामीण आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पाहणी केली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची ही सराव फेरी यशस्वीपणे पूर्ण केली असून लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.
3. पादचाऱ्यांना लुटणारे दोघे गजाआड
जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांना लुटणारी दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे पंकज राजू मांजरेकर आणि शाबीर दिलावर शेख अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे
4. शूल्क आकारणी बाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश
क्षणिक शुल्क आकारावे शुल्क जमा न करणाऱ्यांची अडवणूक करू नये असे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत मनसेने यासाठी पुढाकार घेतला होता पालकांची अडवणूक केल्यास मनसेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केले
5. बोठे यास शोधण्यासाठी लाखाचे बक्षीस लावा - अॅड.लगड
रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे यास शोधून सापडून देणाऱ्यास एक लाखाच्या पुढे बक्षीस जाहीर करावे, अशी मागणी ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे. तसेच बोठेला मदत करणाऱ्या वकिलांचे कॉल डिटेल्स तपासण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
No comments
Post a Comment