Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - साईभक्तांच्या कोरोना चाचणीचे अहवाल तात्काळ द्या

No comments

  News24सह्याद्री - साईभक्तांच्या कोरोना चाचणीचे अहवाल तात्काळ द्या...पहा जिल्ह्याची खबरबात


TOP HEADLINES

1. मानव सुरक्षा सेवा संघाकडून भंडारा घटनेचा निषेध
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत होरपळून दहा नवजात बालकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. त्यात 3 नवजात बालकांचा होरपळून तर 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून व दोषीवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले
 
2. मंडपातच हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचे निधन
 लग्न मंडपातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवरदेवाचे निधन झाल्याची घटना कर्जत तालुक्यात घटली. शेवटची मंगलाष्टक राहिली असताना नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचार सुरू करण्याआधीच त्याचे निधन झाले. विवाह समारंभात घडलेल्या या घटनेने आभास कोसळणे काय असते याचा अनुभव सर्वांना आला. संसार फुलण्याआधीच अशा क्रूर पद्धतीने नियतीने कोमेजवला त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते

3. श्रीगोंदा तालुक्यात बर्ड फ्लूचा अंदाज, नागरिकांमध्ये दहशत
श्रीगोंदा शहरातील एका शाळेसमोरील कॉम्प्लेक्समध्ये एक पारवा मयत अवस्थेत आढळून आला यामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांनी दक्ष नागरिक फाउंडेशन शी संपर्क केला. पारवा पशुवैद्यकीय अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे तपासणीसाठी पाठवला असता तो अहमदनगर येथून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान हा पारवा बर्ड फ्लूने मेला नसावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बोलून दाखवला

4. नऊ वर्षात रुग्ण गतीला लागला मोठा ब्रेक
संगमनेर तालुक्यातील कोरोना संक्रमणाला लागलेली ओहोटी सलग दहाव्या दिवशी कायम आहे रोज आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शहर व तालुक्याची सरासरी एकेरीत आली. त्यातच येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला ही सुरुवात होत असल्याने याचा पराभव अंतीम टप्प्यात आला आहे

5. घराचा दरवाजा तोडून जबरी चोरी
कोपरगाव तालुक्यातील ओगदी  ग्रामपंचायत हद्दीमध्ये पहाटेच्या वेळी तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील ५० हजार रुपये जवळपास ६ तोळे सोन्याचे दागिने असा ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला असून यावेळी एका महिलेला मारहाण हि करण्यात अली याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

6. कौठा ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
श्रीगोंदा तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरणे छाननी करणे अर्ज माघार घेणे इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना निवडणूक निर्णय अधिकारी धोंडीराम मूळे यांनी राजकीय दबावाला बळी पडून २२ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचे निवडणूक चिन्ह वाटपानंतर ३ दिवसानंतर बदलल्यामुळे कौठा ग्रामस्थांनी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार याना निवडणूक प्रक्रियेवर बहिष्ष्कार टाकण्याचं निवेदन दिलय

7. साईभक्तांच्या कोरोना चाचणीचे अहवाल तात्काळ द्या
शिर्डी हे साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून याठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून साईभक्त मोठ्या प्रमाणात यतात साईमंदिर खुले झाल्यापासून याठिकाणी साईभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीये त्यामुळे एखादा कोरोना बाधित रुग्ण जर शिर्डीत आला तर त्याचा प्रादुर्भाव शिर्डीमध्ये वाढू शकतो बाहेरील शहरातून विमानाने शिर्डीत येणाऱ्यया साईभक्त आणि प्रवाशांची रॅपिड टेस्ट करून त्यांना झटपट अहवाल देऊन विमानतळाबाहेर सोडण्यात यावं अशी मागणी केली जातीये

8. इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारचा निषेध
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच तहसीलदार मनीषा कुलकर्णी याना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात अली

9. श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा रद्द
राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान ची पोर्णिमेला म्हणजेच 28 ते 30 जानेवारीला होणारी  वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे प्रशासनाने यासाठी परवानगी दिली नसल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला

10. वृद्धेश्वर कारखान्यासाठी 7 अर्ज दाखल; 80 अर्जाची विक्री
पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज 7 अर्ज दाखल झाले आहेत. . तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *