मोठी बातमी - सिव्हील हॉस्पीटलच व्हेंटीलेटवर; जिल्हाधिकार्यांचे आदेश कोलले!
News24सह्याद्री -
जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असणार्या जिल्हा रुग्णालयाचा अर्थात सिव्हील हॉस्पिटलचा भोंंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत असले तरी नगरचा आरोग्य विभाग त्यास अपवाद आहे असंच काहीसे विदारक चित्र समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील लिप्ट गेल्या महिनाभरापासून बंद आहे. अत्यवस्थ रुग्णांना वरच्या मजल्यावर हलवताना त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचार्यांना अक्षरक्ष: घाम फुटतो. अत्यवस्थ रुग्ण स्ट्रेचरवर घेऊन अथवा त्याच्या हातात हात घालून त्याला जीन्याच्या पायर्यांद्वारे उचलून वरच्या मजल्यावर आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना बंद पडलेली लिप्ट सुरू होण्याचे नाव नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आरोग्य विभागाकडे जातीने लक्ष घातले आहे. नागरिकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले असले तरी सिव्हील सर्जन डॉ. पोखरणा यांनी जिल्हाधिकार्यांचे आदेश फाट्यावर मारल्याचेच दिसते.
No comments
Post a Comment