Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - जिल्ह्यातील आरक्षण कार्यक्रम आज होणार जाहीर

No comments

 News24सह्याद्री -



जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला होणार आहेत. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी ७०५ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. ५७८८ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र सरपंच कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. 

अनेक ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण पॅनल तर काही गावात अर्धवट पॅनल निवडून आले आहेत. त्यामुळे त्या गावात आरक्षणानंतरच कोणत्या गटाचा उमेदवार निवडून येणार आहे, ते समजणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील आरक्षण कार्यक्रम आज जाहीर होईल. तसेच आरक्षण कसे असेल त्याची रुपरेषाही स्पष्ट होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *