Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात कोंबड्यांच्या मृत्यू नंतर आता कावळे मेल्याने एकच खळबळ

No comments

  News24सह्याद्री - 


पाथर्डी तालुक्यात काल काही कोंबड्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता जामखेड आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मोहा गावाजवळ कावळे मरत असल्याने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. मोहा फाट्यावर कालपासून तीन ते चार कावळ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मोहा गावातील ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळविले आहे . बीड जिल्ह्यातील आष्टी गावात काही कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते बर्ड फ्लू नेच मेले, असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे.

आष्टी गावापासून काही किलोमीटर अंतरावरच नगर बीड जिल्ह्याच्या हद्दीवर मोहा हे गाव असून याठिकाणी कावळे मृत झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे याबाबत आता प्रशासनाने सतर्कता घेत कावळ्यांचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *