ड्रॅगनफ्रुटचे आरोग्यदायी फायदे
मुंबई -
ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. मूलतः मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पिक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड कशा प्रकारे केली जाते, याबाबत काही महत्त्वाची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया (pitahaya किंवा pitaya) या नावानेही संबोधले जाते.
१. विटामीन सी असते
एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.
२. रोग प्रतीकार शक्ती वाढते.
हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.
३. सौंदर्य ही वाढते
ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेले दिसतात.
४. कोलेस्टेरॉल कमी होते
ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.
५. हेमोग्लोबिन वाढवते
ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.
६. संधीवातासाठी आरोग्यदायी
खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.
७. कॅन्सरचा प्रतिबंध करते
अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला अटकाव करते. कारण कि फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फ्ल्याच्य सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कि काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.
८.गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते
रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीनां रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.
९. शक्ती निरोगी बनवते
माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती निरोगी बनवते.
१०. लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत करते
सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या गाळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते.
११. मधू मेह नियंत्रित ठेवते
मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.
No comments
Post a Comment