9 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. भंडाऱ्यातील मन सुन्न करणाऱ्या घटनेवर मोदीही हळहळले
महाराष्ट्रातील भंडारामध्ये जिल्हा सरकारी रूग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांना आपला जीव गमवाव लागला. मन सुन्न करूण टाकणाऱ्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले आहेत.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. जे बालक जखमी झाले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असंही मोदींनी म्हटलं आहे. यासंदर्भात मोदींनी ट्विट केलं आहे.
2. भंडाऱ्याची घटना दुर्दैवी, रुग्णालयांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही' : मुख्यमंत्री
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
3. नागपूर जिल्ह्यात ५०० हून अधिक पक्षांचा मृत्यू,
राज्याचा पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूचा धोका नसल्याचे सांगत असला तरी नागपूर नजीकच्या कोंढाळी भागातील रिंगणाबोडी, माणिकवाडा, मसाळा, शिवा, आकेवाडा आदी भागात ५०० हून अधिक चिमन्या, पोपट, कावळे आदी पक्षांचा मृत्यू झाला आहे. पक्षांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक पशुपालकात भितीचे वातावरण पसरले आहे.
4. नव्या स्ट्रेनचा हाहाकार! 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण;
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भीतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले असून हाहाकार पाहायला मिळत आहे. 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
5. यशवंत मनोहर यांना "जीवनव्रती पुरस्काराने गौरवणार
दरवर्षी मकर संक्रांतीला अर्थ 14 जानेवारी रोजी येत असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या स्थापना दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध साहित्य पुरस्कार देण्यात येतात. येत्या 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या झाशीची राणी चौकातील 'रंगशारदा' सभागृहात विदर्भ साहित्य संघाचा 98 वा स्थापनादिन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कोल्हे यांच्यासह अनेकांना विविध साहित्यविषयक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. त्यामध्ये संघाचा 'ग. त्र्यं माडखोलकर जीवनव्रती पुरस्कार' विख्यात लेखक यशवंत मनोहर यांना दिला जाणार आहे.
6. भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. कडाक्याच्या थंडीतही दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. चुशूल विभागातील गुरूंग खोऱ्याजवळील सीमेवरून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले आहे. दरम्यान, आपण रस्ता भटकून भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या चिनी सैनिकाने केला आहे.
7. अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले फोनवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी साधणार संवाद
अमेरिकेचे माळवते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये भंयकर गोंधळ घातला. लाखोंच्या संख्येने डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत जबदस्ती घुसून तोडफोड केल्याने संसंदेचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचेच नव्हे तर सगळ्या जगाच्या निशाणाऱ्या वर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेची निंदा केली आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठावले यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
8. मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा
काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी केली आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची शेख यांची मागणी निंदनीय असून या मागणी आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. पण काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
9. हिंसेला चिथावणी देण्याच्या भीतीमुळे कारवाई
अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.
10. मोदी यांची सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
करोना लसीकरण रणनीतीबाबत चर्चा आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी (ता. ११) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे शुक्रवारी सूत्रांनी सांगितले.
No comments
Post a Comment