Breaking News

1/breakingnews/recent

18 जानेवारी Good Morning सह्याद्री

No comments

    News24सह्याद्री - वेबसीरीज वादाबाबत आलेल्या तक्रारींची केंद्राकडून दखल....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES


1. पंतप्रधान मोदी यांना जी ७ परिषदेसाठी निमंत्रण
या वर्षांच्या मध्यात ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणाऱ्या जी ७ राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ही उच्चस्तरीय परिषद ११ ते १३ जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  

2. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे आणि दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्यांचे आंदोलन यांच्याशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज, सुनावणी घेणार आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले.  

3. सव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस
देशव्यापी करोना लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत दोन लाख २४ हजार ३०१ करोनायोद्धय़ांना लस टोचण्यात आली. त्यापैकी ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली.  

4.  शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी यावर दिला. तसेच शेवटी बंगाली भाषेत ‘जय हिंद’ अशी घोषणाही त्यांनी केली.

5. राज्याचं करोनाबाधितांचं बरं होण्याचं प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज ३,०८१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला. आज नवीन २,३४२ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १८,८६,४६९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७६ टक्के झालं आहे.

6. कराड तालुक्याच्या उत्तरभागात कुकुटपक्ष्यांचा मृत्यू
महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ फैलावल्याने कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत येताना, चिकन व अंडी खवय्यांसह लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच, कराड तालुक्याच्या उत्तर भागातील हणबरवाडी येथे कुकुटपक्षी (कोंबडय़ा) अचानक मृत पावल्याने एकच खळबळ उडाली. यावर संबंधित प्रशासनाने खबरदारी म्हणून हणबरवाडीपासून दहा किलोमीटर परीघ निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 

7. वेबसीरीज वादाबाबत आलेल्या तक्रारींची केंद्राकडून दखल
अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील अधिकाऱ्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाने समन्स बजावले आहे.या प्रकरणी दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या यांमध्ये भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून तांडव या वेबसीरीजवर बंदी घालण्याची तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉर लावण्याची मागणीही केली.

8. प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा धोका
खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून या महत्वाच्या दिवशी दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस अधिकच सतर्क झाले असून, सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.  

9. अयोध्येतील मंदिराच्या नावावर उकळत होते पैसे
अशात राम मंदिराच्या नावावर पैसे उकळण्याची बोगसगिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या नावानं पावत्या छापून पैसे गोळा करण्याचं काम काहीजणांकडून सुरू होतं. याप्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे  

10. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू न देण्याच्या बातम्या खोट्या
समितीचे समन्वयक मंदीप नाथवान म्हणाले, “काही लोक कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. अशा अफवा शेतकऱ्यांच्या संघर्षाला कमजोर करतात. ही लढाई केंद्र आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात असून दिल्लीच्याविरोधात नाही.”

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *