15 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - पुण्यात डॉक्टर महिलेला हत्येची धमकी देत मागितली 5 लाखांची खंडणी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. निलेश राणेंच्या टीकेवर अजित पवार संतापले; म्हणाले, डोक्यावर परिणाम झाला आहे
अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काही बोलतात आणि मी त्यावर बोलायचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे म्हणत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
2. बचपन बचाव संघटना महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन.
आमच्या मागण्याची त्वरीत दखल घेवून शेतकरी मुला-मुलींना दिलासा द्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर बचपण बचाव संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिली आहेय.
3. कंपन पक्षाचे सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर
कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टी पासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर करून येतात.
4. पुण्यात डॉक्टर महिलेला हत्येची धमकी देत मागितली 5 लाखांची खंडणी
याप्रकरणी, बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरातील एका डॉक्टर महिलेने मार्केट यार्ड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मूळ छत्तीसगड) याला बेड्या ठोकल्या आहेत.
5. महाराष्ट्रातील कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही - अनिल देशमुख
महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करुन घेत नसल्याची तक्रार केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री असल्याचे म्हणत सूचक विधान केले आहे.
6. इंडोनेशियात 6.2 तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 7 मृत्यू;
इंडोनेशियातील सुलावेसी बेटात शुक्रवारी तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात 7 लोकांचा बळी गेला आहे. तर100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. इंडोनेशियातील आपत्ती निवारण एजन्सीने सांगितले की, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.2 होती. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली असल्याचे सांगितले जात आहे.
7. नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार
नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
8. धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा जाहीर केली आहे. पण मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आग्रही भूमिकेत आहे. आता धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
9. राम मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश
मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला आहे. आज विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह अनेक हिंदू संघटनांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
10. 30 जानेवारीला अण्णा हजारे करणार शेवटचं उपोषण
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी यापूर्वीच दिला होता.
No comments
Post a Comment