छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 14’च्या टीममधील सदस्याचे निधन
मुंबई -
बिग बॉसच्या छोट्या पडद्यावरील 14’ या शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे निधन झाले आहे. बिग बॉसचा विकेंड वॉर या भागाचे चित्रीकरण संपल्यानंतर पिस्ता घरी जात होती. मात्र, वाटेत पिस्ताला अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला आहे. ‘विकेंड वॉर’चे फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरु होते. हे चित्रीकरण संपल्यानंतर रात्री उशीरा पिस्ता तिच्या सहकाऱ्यासोबत घरी जात होती.
यावेळी काळोखाचा अंदाज न आल्यामुळे तिची दुचाकी एका खड्ड्यात अडकली. याचवेळी समोर येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली, ज्यात पिस्ताचा जागीच मृत्यू झाला. पिस्ताच्या मृत्यूमुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. पिस्ताने अनेक मालिका आणि शो साठी काम केले होते. ‘बिग बॉस’पूर्वी तिने ‘खतरों के खिलाडी’ ‘द व्हॉइस’ या शोसाठी काम केले आहे.
No comments
Post a Comment