टेस्ट रँकिंगमध्ये मध्ये विराटची घसरण, 1 कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला फटका
मुंबई -
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेत भारताचा विकेटकीपर रिषभ पंतने ब्रिस्ब्रेन येथील अंतिम कसोटीत 89 धावांची आक्रमक खेळी करत भारताला सामन्यासाह मालिका विजय मिळवून दिला. रिषभ पंतला 89 धावांच्या खेळीचा फायदा झाला असून आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये तो 13 व्या स्थानावर पोहोचला असून विकेटकीपर बॅटसमनच्या रँकिंगकमध्ये पंत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्टिंटन डी कॉक 15 व्या स्थानावर आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचे स्थान ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशचेंज याने पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत फक्त 1 कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला फटका बसला आहे. विराटची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लडंचा बॅटसमन जो रुट पाचव्या स्थावर पोहोचला आहे.
No comments
Post a Comment